lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्यात पाच ठिकाणी संरक्षण उत्पादन ‘हब’; आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र आणूच

राज्यात पाच ठिकाणी संरक्षण उत्पादन ‘हब’; आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र आणूच

केंद्र सरकारचे ‘मेक इन इंडिया’ राज्यातील औद्योगिक विकासासाठी पुरक ठरत असून त्यासाठीच पाच ठिकाणी संरक्षण उत्पादन ‘हब’ उभा केला जाईल. यासंबंधीचे सामंजस्य करार ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ कन्व्हर्जन्स’ या गुंतवणूक परिषदेत होतील, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:00 AM2018-02-16T04:00:53+5:302018-02-16T04:01:02+5:30

केंद्र सरकारचे ‘मेक इन इंडिया’ राज्यातील औद्योगिक विकासासाठी पुरक ठरत असून त्यासाठीच पाच ठिकाणी संरक्षण उत्पादन ‘हब’ उभा केला जाईल. यासंबंधीचे सामंजस्य करार ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ कन्व्हर्जन्स’ या गुंतवणूक परिषदेत होतील, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

Five production centers in the state are 'Hub'; Launch International Finance Center | राज्यात पाच ठिकाणी संरक्षण उत्पादन ‘हब’; आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र आणूच

राज्यात पाच ठिकाणी संरक्षण उत्पादन ‘हब’; आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र आणूच

मुंबई : केंद्र सरकारचे ‘मेक इन इंडिया’ राज्यातील औद्योगिक विकासासाठी पुरक ठरत असून त्यासाठीच पाच ठिकाणी संरक्षण उत्पादन ‘हब’ उभा केला जाईल. यासंबंधीचे सामंजस्य करार ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ कन्व्हर्जन्स’ या गुंतवणूक परिषदेत होतील, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाºया या गुंतवणूक परिषदेसंदर्भात उद्योग मंत्र्यांनी गुरूवारी पत्रपरिषद घेतली. ते म्हणाले, केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्र खासगी व विदेशी कंपन्यांसाठी खुले केले आहे. हे ध्यानात घेऊनच राज्य सरकारने संरक्षण व हवाई क्षेत्रासाठी विशेष धोरण तयार केले आहे. या धोरणाचा लाभ घेत नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर व पुण्यात संरक्षण हब उभा करण्याची योजना आहे. आम्हाला सुटे भाग व अन्य सामग्री येथेच तयार करणाºया कंपन्या हव्या आहेत. त्यादृष्टीने ही परिषद महत्त्वाची असेल. परिषदेला १५० सीईओ उपस्थित राहणार आहेत.
सरकारने औद्योगिक क्षेत्राशी संबंधित १२ धोरणांना मंजूरी दिली. जुन्या औद्योगिक धोरणाला मुदतवाढ दिली. आता या परिषदेत होणारे ४५०० सामंजस्य करार हे या धोरणांना अनुसरूनच होतील, असे त्यांनी सांगितले. मेक इन इंडियाचे यश राज्याने प्राप्त केल्याचा दावाही त्यांनी केला. २१२१ करारांबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. त्यातील काही कंपन्या सुरूही झाल्या, असे त्यांनी सांगितले. या परिषदेच्या निमित्ताने महाराष्टÑाची औद्योगिक ताकद व ओळख जगाला होईल, असे मत उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनिल पोरवाल यांनी व्यक्त केले. एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांनी यावेळी परिषदेतील विविध चर्चासत्रांची माहिती त्यांनी दिली. सीआयआय (भारतीय उद्योग महासंघ) हे या कार्यक्रमाचे राष्टÑीय भागिदार आहेत. लघु व मध्यम उद्योगांच्या शेअर बाजारात (एसएमई एक्सचेंज) मॅग्नेटिक महाराष्टÑच्या पार्श्वभूमीवर १०१ वी कंपनी प्रविष्ट झाली. देसाई यांच्याहस्ते हा सोहळा बीकेसीतील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत पार पडला. सिंटरकॉम इंडिया लिमिटेड ही ती कंपनी आहे. भरमसाठ गुंतवणुकीचे आश्वासन दिलेली ‘फॉक्सकॉन’ कंपनी अद्यापही आलेली नाही. यासंबंधी देसाई यांनी ‘फॉक्सकॉन’ चा बाऊ का करता?, गुंतवणूक करणारी ती एकमेव कंपनी नाही. फॉक्सकॉन आली तर स्वागत, नाही आली तर खंत नाही.

आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र आणूच
मुंबईत येणारे आंतरराष्टÑीय वित्त सेवा केंद्र मागील सरकारने केलेल्या हलगर्जीपणामुळे गुजरातच्या गिफ्ट सिटीत गेले. मात्र या केंद्रासाठीची जागा बीकेसीमध्ये आजही राखीव आहे. त्यामुळे हे केंद्र मुंबईत आणूच, असा विश्वास देसार्इंनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Five production centers in the state are 'Hub'; Launch International Finance Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.