lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकऱ्या वाढल्या की घटल्या ?, परस्परविरोधी सर्व्हे

नोकऱ्या वाढल्या की घटल्या ?, परस्परविरोधी सर्व्हे

देशभरातील नोक-यांसंबंधी दोन सर्व्हे मागील आठवड्यात प्रसिद्ध झाले. निक्केई इंडियाच्या सर्वेक्षणात नोक-यांच्या निर्देशांकात वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:38 AM2018-04-10T00:38:42+5:302018-04-10T00:38:42+5:30

देशभरातील नोक-यांसंबंधी दोन सर्व्हे मागील आठवड्यात प्रसिद्ध झाले. निक्केई इंडियाच्या सर्वेक्षणात नोक-यांच्या निर्देशांकात वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Do the jobs increase or decrease ?, conflicting surveys | नोकऱ्या वाढल्या की घटल्या ?, परस्परविरोधी सर्व्हे

नोकऱ्या वाढल्या की घटल्या ?, परस्परविरोधी सर्व्हे

मुंबई : देशभरातील नोक-यांसंबंधी दोन सर्व्हे मागील आठवड्यात प्रसिद्ध झाले. निक्केई इंडियाच्या सर्वेक्षणात नोक-यांच्या निर्देशांकात वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) २०१७-१८ या
आर्थिक वर्षात बेरोजगारी दरात मोठी वाढ झाल्याचे म्हटले आहे. यामुळे नोक-या नक्की वाढल्या की घटल्या? याबाबत संभ्रम आहे.
‘अच्छे दिन’ वर देशभरात टीका होत असल्याने केंद्र सरकारने स्वत: देशातील नोक-यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार व रोजगार मंत्रालयाद्वारे सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील नोक-यांचा सर्व्हे केला जात आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे सर्वेक्षण सुरू झाले असताना त्याच दरम्यान यासंबंधीचे अन्य अहवाल प्रसिद्ध झाले आहेत, हे विशेष.
>निक्केई : रोजगाराचा निर्देशांक वाढला
निक्केई इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीच्या सर्वेक्षणात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमधील नोक-यांमध्ये वाढ झाल्याचे नमूद केले आहे. फेब्रुवारीत ४७.८ टक्के असलेला निर्देशांक मार्चमध्ये ५०.३ टक्क्यांवर पोहोचला. यातून अर्थव्यवस्था विस्तारल्याचे चित्र दिसते, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या देशभरात विविध क्षेत्रांतील मागणी वाढली आहे. त्यासाठी वस्तूंचा पुरवठा वाढणे आवश्यक आहे. त्यामुळेच विविध क्षेत्रांत कर्मचा-यांची संख्या वाढल्याचे सर्वेक्षणाचे म्हणणे आहे.
>सीएमआयई : ७ लाख नोक-या घटल्या
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात सीएमआयई आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज यांनी देशातील नोकºयांच्या स्थितीचे संयुक्तपणे वर्षभर सर्वेक्षण केले. त्यानुसार २०१६-१७ मध्ये देशात ४०.६७ कोटी नोकºया होत्या. हा आकडा २०१७-१८ या आर्थिक वर्षात ४०.६० कोटींवर आला. याचाच अर्थ वर्षभरात ७ लाख नोकºया कमी झाल्या. नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात बेरोेजगारीचे प्रमाण ४ टक्के होते. ते वर्ष अखेरपर्यंत ५.८ टक्क्यांवर आले. त्याच वर्षात शहरांमधील बेरोजगारीचा सरासरी दर ५.५ टक्के तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा सरासरी दर ४.२८ टक्के राहिला.

Web Title: Do the jobs increase or decrease ?, conflicting surveys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी