lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिओ ब्रॉडबँडला एअरटेल देणार टक्कर ?

जिओ ब्रॉडबँडला एअरटेल देणार टक्कर ?

जिओकडून सुरू करण्यात येणार असलेल्या ब्रॉडबँड सुविधेला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने ब्रॉडबँडच्या प्लॅनवर विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे.

By admin | Published: May 27, 2017 01:18 PM2017-05-27T13:18:28+5:302017-05-27T13:18:28+5:30

जिओकडून सुरू करण्यात येणार असलेल्या ब्रॉडबँड सुविधेला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने ब्रॉडबँडच्या प्लॅनवर विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे.

Airtel to take a call against Geo Broadband? | जिओ ब्रॉडबँडला एअरटेल देणार टक्कर ?

जिओ ब्रॉडबँडला एअरटेल देणार टक्कर ?

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 27- रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भरघोष ऑफर्स मिळत आहेत. लवकरच जिओकडून इंटरनेट ब्रॉडबँड सुविधा सुरू केली जाणार आहे. पण ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये येण्याच्या आधीच जिओला टक्कर देण्याची तयारी सुरू झाली आहे. जिओकडून सुरू करण्यात येणार असलेल्या ब्रॉडबँड सुविधेला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने ब्रॉडबँडच्या प्लॅनवर विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे. एअरटेल ब्रॉडबँडच्या प्लॅनवर 1000 जीबी बोनस डेटा देण्याचा निर्णय एअरटेलने घेतला आहे. सध्या एअरटेलकडून 899 रूपयात 750 जीबीचा इंटरनेट प्लॅन मिळतो आहे. 1000 जीबी बोनस डेटाची ऑफर 1099 रूपये,  1,299 रुपये आणि 1,499 रुपयांच्या डेटा प्लॅनवर लागू होणार असल्याची माहिती मिळते आहे. 

एअरटेलकडून सुरू करण्यात आलेल्या या नव्या सुविधेचा संबंध जिओशी जोडला जातो आहे. जिओच्या ब्रॉडबँड सर्व्हिसची चाचपणी काही भागामध्ये करण्यात आली आहे. लवकरच जिओकडून ब्रॉडबँडची सर्व्हिस लाँच केली जाणार आहे. याच पार्श्वभूमिवर एअरटेलने खास ऑफर दिल्याचं बोललं जातं आहे.   एअरटेलची नवी ऑफर दिल्ली आणि एनसीएर युजर्स ऑनलाइन खरेदी करू शकतात. एअरटेलची ही नवी ऑफर कोणत्याही कमर्शिअल कंपनीला लागू होणार नाही तसंच नवा प्लॅन फक्त नविन सदस्यत्व घेणाऱ्यांना मिळणार आहे. 
 
एअरटेलचा नवा प्लॅन
- 899 रूपयाच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स करता येतील. तसंच 16 mbpsच्या स्पीडने 60 जीबी डेटा मिळेल. यासोबत मिळणाऱ्या 750 जीबी बोनस डेटा एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल.
- 1099 रूपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्ससह 40 mbpsच्या स्पीडचा 90जीबी डेटा मिळेल. तसंच 100 जीबी बोनस डेटा दिला जाणार आहे.
- 1299, 1499 आणि 1799 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल्स मिळतील. तसंच अनुक्रमे 125 जीबी, 160जीबी आणि 220 जीबी डेटा मिळेल. महत्त्वाचं म्हणजे 1000 जीबी बोनस डेटा दिला जाणार आहे. 
एअरटेलच्या साइटवर ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
 

Web Title: Airtel to take a call against Geo Broadband?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.