lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५० लाख ट्रकमालक बेमुदत संपावर, राज्यावर थेट परिणाम नाही

५० लाख ट्रकमालक बेमुदत संपावर, राज्यावर थेट परिणाम नाही

वाढत्या इंधनदरांविरुद्ध देशभरातील जवळपास ५० लाख ट्रकमालकांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:47 AM2018-06-19T00:47:25+5:302018-06-19T00:47:25+5:30

वाढत्या इंधनदरांविरुद्ध देशभरातील जवळपास ५० लाख ट्रकमालकांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.

50 lakh truckload of unmarked strikes, no direct result of the state | ५० लाख ट्रकमालक बेमुदत संपावर, राज्यावर थेट परिणाम नाही

५० लाख ट्रकमालक बेमुदत संपावर, राज्यावर थेट परिणाम नाही

कोलकाता : वाढत्या इंधनदरांविरुद्ध देशभरातील जवळपास ५० लाख ट्रकमालकांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा महाराष्ट्रावर सध्या थेट परिणाम झालेला नाही, पण राज्याबाहेरून येणाऱ्या मालावर आगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. मालवाहतूकदारांनी डिझेल ६४ रुपये लीटरवर असताना वाहतूक दर निश्चित केले होते. आता डिझेल ७२ रुपयांवर पोहोचले आहे, पण व्यावसायिक स्पर्धा आयोगाचा (सीसीआय) बडगा दाखवत, सरकार वाहतूकदारांना दरवाढ करू देत नाही. यामुळेच इंधनदर कमी करण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया कॉन्फेडरेशन आॅफ गुड्स व्हेइकल ओनर्स असोसिएशनने (आयकग्वो) सोमवारपासून संप पुकारला आहे. ‘आयकग्वो’चे मुख्यालय दिल्लीत असले, तरी संघटनेचे सर्वाधिक सदस्य पश्चिम बंगालमध्ये आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, तसेच कर्नाटक व तामिळनाडू या भागात संघटनेचा प्रभाव आहे. मालवाहतूकदार संपावर गेल्याने, त्या राज्यातून महाराष्ट्रात येणाºया मालाची आवक थांबण्याची शक्यता आहे.
‘एआयएमटीसी’चा संप २० जुलैला
‘एआयएमटीसी’नेही इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी या आधी २० जूनला संपाचा इशारा दिला होता, पण त्याआधीच ‘आयकग्वो’ने १८ जूनपासून संप पुकारला. त्यामुळे ‘एआयएमटीसी’ने त्यांचा संप एक महिना पुढे ढकलला आहे. ते २० जुलैपासून संपावर जाणार आहेत.
>राज्यात सदस्यांची संख्या कमी
हा संप ज्या ‘आयकग्वो’ संघटनेने पुकारला आहे, त्या संघटनेच्या राज्यातील सदस्यांची संख्या खूप कमी आहे. राज्यात महाराष्टÑ मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही सर्वात मोठी संघटना असून, ती आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी (एआयएमटीसी) संलग्न आहे. देशभरातील ९३ लाख ट्रक व ५० लाख बसेस एआयएमटीसीशी संलग्न आहेत. त्यामुळेच या संपाचा महाराष्टÑावर थेट परिणाम होणार नाही, असा दावा महाराष्टÑ मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद नाटकर यांनी केला आहे.

Web Title: 50 lakh truckload of unmarked strikes, no direct result of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.