How to make business project report ..? | बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा..?

- शिवांगी झरकर

‘‘उद्योगाचे स्वप्न नुसते उराशी नका बाळगू, आता त्याला
बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये रूपांतरित करून वास्तवात घडवू..!’’

बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे आपल्या भावी उद्योगाचा, संभाव्य नफ्याचा आणि आगामी पाच वर्षांतील उत्पन्नाचा रीतसर आढावा असतो.

१. बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय?
आपल्या मनात जेव्हा जेव्हा उद्योग करण्याची कल्पना येते तेव्हा तेव्हा आपण त्या कल्पनेला वास्तवाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत असतो. याच वास्तविक स्वरूपाला घडवण्याच्या मार्गात पहिले पाऊल म्हणजे आपल्या उद्योगाचा प्रोजेक्ट रिपोर्ट. बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे आपल्या भावी उद्योगाचा, त्याच्या पद्धतीचा, संभाव्य नफ्याचा आणि आगामी पाच वर्षांतील उत्पन्नाचा रीतसर आढावा असतो. ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कल्पनेला वास्तवात उतरवण्यात मदत करू शकता.
बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्टचे फायदे:-
१. बिझनेस मॉडेल डिझाईन करण्यात फायदा होतो.
२. उद्योगाचे नियोजन करण्यास मदत मिळते.
३. बँकेतर्फे कर्ज मिळवण्यास मदत मिळते.
४. बिझनेस स्टार्ट-अपसाठी प्राथमिक गुंतवणूकदार मिळवण्यास मदत होते.
५. प्रत्येक पाऊल तोलूनमापून घेण्यास मदत होते.
बिझनेस प्रोजेक्टचा आराखडा:-
१. आपल्या कंपनीची प्रस्तावना, कंपनी प्रोफाइल, सर्व पार्टनर / मालक / डायरेक्टर यांची संपूर्ण माहिती. यात तुम्हाला कंपनीची माहिती, कंपनीचे व्हिजन, मिशन, वैशिष्ट्ये आणि प्रॉडक्ट / सर्विसेसची संपूर्ण माहिती.
२. आपल्या कला / कौशल्य / निपुणता / वैशिष्ट्ये यांची सविस्तर माहिती. जर तुमच्यामध्ये एखादी कला, कौशल्य किंवा एखादी निपुणता असेल आणि त्याच्या संदर्भातील एखादे सर्टिफिकेशन असेल तर त्याची प्रत जोडा.
३. प्रोजेक्टचे ध्येय आणि लक्ष्य:-
प्रोजेक्टचे व व्यवसायाचे धोरण, ध्येय आणि हे प्रोजेक्ट करण्यामागचे उद्दिष्ट सविस्तर लिहिणे आवश्यक आहे.
४. फ्युचर प्लॅनिंग:-
प्रोजेक्ट रिपोर्टचा महत्त्वाचा भाग असतो फ्युचर प्लॅनिंग; कारण यात तुमच्या उद्योगाचे भविष्य अवलंबून असते. त्यापेक्षा भविष्यात तुम्ही काय करू शकता त्याच्या संभाव्य शक्यता तुम्ही नियोजित करू शकता.
५. मार्केटिंग स्ट्राटेजी, मार्केटिंग अरेंजमेंट:-
यामध्ये मार्केटचा संपूर्ण अंदाज, मार्केटिंगच्या आणि प्रमोशनच्या पद्धती आणि मार्केटिंगसाठी विविध टेक्निक यांचा समावेश होतो.
६. कि-रोल पर्सनेल याची माहिती:-
प्रोजेक्टच्या मुख्य व्यक्तींची मुख्य भूमिका, त्यात त्याचे उद्योगाशी निगडित शिक्षण, कौशल्य आणि विशेष सर्टिफिकेट इत्यादी.
७. तुमच्या उद्योगाची, प्रोडक्टची आणि सर्विसेसची क्षमता:-
यात तुम्हाला तुमच्या उद्योगाची उत्पादन क्षमता, त्याचा दर्जा, तुमच्या प्रोडक्टचा किंवा सर्व्हिसचा दर्जा, त्याची क्षमता ठरवणे आवश्यक आहे. जमल्यास त्या निगडितची सर्व सर्टिफिकेट सादर करा.
८. आर्थिक नियोजन:-
उद्योगासाठी लागणारी प्राथमिक गुंतवणूक हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक प्रोजेक्टच्या १० टक्के ही त्या प्रोजेक्टची प्राथमिक आवश्यकता असते. त्यामुळे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असलेल्या रकमेच्या १० टक्के आर्थिक गुंतवणूक जमा करणे आवश्यक आहे.
९. इन्फ्रास्ट्रक्चर:-
यामध्ये लागणारी जागा, बांधकाम, मशीन / आॅफिसमध्ये लागणाºया वस्तू यांचा सर्व खर्च आणि त्याची यादी असणे आवश्यक आहे.
१0. ब्रॉशर आणि माहितीपत्रक:-
यामध्ये कंपनीचे ब्रॉशर आणि इतर माहितीपत्रक असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व माहिती मिळते.
११. मॅनपॉवर:-
यात तुम्हाला किती मजूर किंवा आॅफिस स्टाफ लागेल त्याची संख्या लिहा. त्याचसोबत इतर किती निपुण आणि शिकाऊ स्टाफ लागणार त्याची यादी करा.
१२. वेतन आराखडा:-
यामध्ये सर्व प्रकारच्या कर्मचाºयांचे वेतन बिल येते. त्यात सर्व प्रकारची बिले येतात.
१३. संपूर्ण प्रोजेक्ट कोस्ट:-
यात संपूर्ण प्रोजेक्टची किंमत दिलेली असते. त्यात जागेची किंमत, आॅफिसमध्ये लागणाºया वस्तू, कच्चा माल, फिक्स असेट, नफ्याचा आराखडा, प्रॉफिट आणि लॉस्ट स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट यामध्ये संपूर्ण उद्योगाची किंमत दिली जाते.
बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट यशस्वी होण्यासाठी लागणाºया बाबी:-
१. खंबीर नेतृत्व - प्रत्येक प्रोजेक्टमध्ये सर्वांत महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे नेतृत्व.
या भागांत दोन गोष्टी प्रामुख्याने समाविष्ट असतात, एक नेटवर्किंग आणि दुसरे टीमप्लेअर म्हणून टीममध्ये राहणे व टीमकडून योग्य असे कार्य करून घेणे.
२. उत्कृष्ट संभाषण उद्योगातील महत्त्वाचा भाग येतो, संभाषण कौशल्य. कारण जर तुम्ही औद्योगिक क्षेत्रात संभाषण शास्त्रात निपुण असाल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल.
३. पार्टनरशिप / असोसिएशन - उद्योग सुरू करताना आपण पार्टनरशिप / असोसिएशन अगदी चोखंदळ पद्धतीने निवडावे. त्यात कायदेविषयक सल्लागार- वकील, आर्थिकदृष्ट्या सल्लागार- सी.ए., कॉम्प्युटर, आय.टी. यांचे जाणकार आणि मॅनेजमेंट- व्यवस्थापन आणि नियोजनाच्या जाणकार व्यक्तींचा समावेश असणे आवश्यक आहे.
४. अतिरिक्त फायदे : यात तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसमध्ये तुम्ही काय फायदे देता जे इतर नाही देऊ शकत याचा समावेश असतो. जसे किंमत कमी,
जास्त क्वांटिटी, उत्कृष्ट क्वालिटी, नावीन्यपूर्ण, एखादा नवीन स्टार्ट-अप असे फायदे असतील तर प्रोजेक्ट जास्त जोमाने पुढे जातो.
५. कंपनीची आखणी : कंपनीची आखणी खालील बाबींवर करावी-
- स्ट्राटर्जीक मॅनेजमेंट- ज्यात कंपनीची रचना, योजना आणि मार्केटचे डावपेच समाविष्ट आहेत.
- आॅर्गनायझेशन पॉलिसी- यात कंपनीचे स्ट्रक्चर, आखणी, बांधणी, व्हॅल्यू समाविष्ट आहे.
- पर्सनल पॉलिसी- यात प्रत्येक पार्टनरशिप / असोसिएशनच्या स्वत:च्या व्हॅल्यू आणि विचारांचा समावेश होतो.
- मार्केटिंग पॉलिसी- या गोष्टीत मार्केटिंग, सेल्स आणि प्रमोशन पॉलिसी आणि त्याच्या रचनेचा समावेश होतो. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या उद्योगाचा ‘बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट’ बनवून कर्जाची मागणी करू शकता. प्रोजेक्ट रिपोर्ट जितका व्यवस्थित असेल तेवढे तुमचे बिझनेस मॉडेल चांगले बनेल.
‘‘जेव्हा उद्योगात नेहमीच निर्माण करायचा असेल औद्योगिक विकास, तेव्हा बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून करा स्वप्न साकार!’’