Paper soap साठी नका खर्च करु पैसे, 'या' DIY ने तयार करा घरीच

आता paper soap घरी करणं एकदम सोपं

प्रवास करतांना स्वच्छता मेंटेन करता यावी यासाठी आपण बाजारातून अनेक महागडे प्रोडक्ट विकत घेत असतो.

प्रवास करतांना हात खराब झाल्यावर आपण सर्रास सॅनिटायझर किंवा सोप पेपरचा वापर करतो. मात्र, या गोष्टी खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात.

सोप पेपर विकत घेण्यापेक्षा तो सोप्या पद्धतीने घरीदेखील तयार करता येतो. हा पेपर घरी कसा तयार करायचा ते पाहुयात.

आपल्या घरात अनेकदा साबण वापरून झाल्यानंतर त्याचे राहिलेले लहान लहान तुकडे आपण फेकून देतो. मात्र, हे तुकडे फेकून देण्यापेक्षा एका भांड्यात घेऊन त्यात थोडं पाणी मिक्स करा.

पाणी आणि साबणाचे तुकडे मंद आचेवर गरम करा. साबण पाण्यात मिक्स होऊन त्याची स्मूद पेस्ट तयार होईल इतपत तो गरम करा.

तयार स्मूद पेस्ट प्लास्टिक पेपर किंवा बटर पेपरवर पसरवा. त्यानंतर हा पेपर वाळवण्यासाठी ठेऊन द्या. पेपरवरील साबणाची पेस्ट पूर्णपणे वाळल्यानंतर त्याचे लहान लहान चौकोनी तुकडे तयार करा.

अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी स्वस्तात पेपर सोप तयार करु शकता.

लहान मुलांना सतत खोकला होतो? असू शकतात 'या' गंभीर समस्याचे संकेत

Click Here