लहान मुलांना सतत खोकला होतो? असू शकतात 'या' गंभीर समस्याचे संकेत

सामान्य वाटणाऱ्या खोकल्याकडे दुर्लक्ष करु नका.

वातावरण बदललं की अनेकदा मुलांना सर्दी किंवा खोकला होतो. परंतु, जर मुलांना वारंवार खोकला होत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे.

वारंवार खोकला होणे हे निमोनियासारख्या समस्येचं लक्षण असतं. त्यामुळे सामान्य वाटणाऱ्या खोकल्याकडे दुर्लक्ष करु नका.

खोकला झाल्यावर श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास घेतांना छातीत खोलवर जाणे, मुले सुस्तावणे यांसारखी लक्षणे दिसत असतील तर त्वरीत डॉक्टांना भेटा.

लहान मुलांमध्ये निमोनिया वेगाने वाढतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नका.

निमोनिया हा बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगसमुळे होतो. ज्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना निमोनिया लवकर होतो.

निमोनियासारखी समस्या टाळायची असेल तर मुलांना सकस घरचा आहार द्या.

मुलांना थंड पदार्थ देणं टाळा. तसंच वेळोवेळी त्यांचं लसीकरण पूर्ण करा.

केवळ फांदी लावूनही सहज उगवणाऱ्या वनस्पती

Click Here