पचनशक्ती कमकुवत असेल तर अनेक शारीरिक व्याधी डोकं वर काढतात. यात खासकरुन पोटाच्या तक्रारी हमखास होतात.
पोटाचे विकार किंवा अन्य शारीरिक व्याधी होऊ नयेत यासाठी आपली पचनशक्ती मजबूत करणं गरजेचं आहे. म्हणूनच, पचनशक्ती वाढविण्यासाठीचे उपाय पाहुयात.
रिकाम्यापोटी कधीही चहा पिऊ नये. चहा कायम ब्रेकफास्टनंतरच घ्यावा.
ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण यांच्यात किमात ४ तासांचं अंतर असावं. तसंच या मधल्या वेळात काहीही खाऊ नये.
दुपारची झोप टाळावी. तसंच जर झोपायची इच्छा झाली तर डाव्या कुशीवर फक्त २० मिनिटे झोपावे. परंतु, त्यापेक्षा जास्त वेळ नाही.
जेवल्यानंतर किचिंत घसा ओला होईल इतपत पाणी प्यावी. मात्र, त्यानंतर निदान १ तास तरी पाणी पिऊ नये. जर तुम्ही लगेचच पाणी प्यायलात तर पचनासाठी लागणारा अग्नी विझून जातो. परिणामी, अन्नपचन नीट होत नाही.