दुखापतीमुळे यंदा धोनी एकही सामना खेळलेला नाही
IPL 2026 चा अर्धा हंगाम संपत आला तरी अजूनही CSKचा महेंद्रसिंग धोनी मैदानात खेळताना दिसलेला नाही.
तो पोटरीच्या दुखापतीतून सावरत असून लवकरच मैदानावर परत येईल, अशी चर्चा काही दिवसांपासून रंगली आहे.
सीएसकेचे चाहतेदेखील धोनी मैदानात उतरण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण ते अजून शक्य झालेले नाही.
CSKचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, धोनीची पोटरीची दुखापत अधिकच वाढली आहे.
"आम्ही सुरुवातीला खबरदारी घेतली होती. पण सरावादरम्यान दुखापत वाढली," असे फ्लेमिंग यांनी सांगितले.
"धोनी शक्य तितक्या लवकर खेळात परत येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे," असेही फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले आहे.
या नव्या अपडेटमुळे चाहत्यांना त्यांच्या लाडक्या धोनीला खेळताना बघण्यासाठी जास्त वाट पाहावी लागेल.