तुम्हाला माहीत आहेत का...?
सकाळची सुरुवात जर निरोगी सवयींनी केली, तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अशीच एक सवय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे.
लिंबू पाणी पिल्याने शरीराला व्हिटॅमिन C मिळते, यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर निघून जातात.
हे वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते, कारण यामुळे मेटाबॉलिजम वाढते.
लिंबू पाणी त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यास मदत करते.
या व्यतिरिक्त लिंबू आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते आणि ऊर्जा प्रदान करते.
मात्र, जास्त प्रमाणात प्यायल्याने दातांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे संतुलन राखणे गरजेचे आहे.