तपकिरी की पांढरा? आरोग्यासाठी कोणता तांदूळ चांगला? 

जाणून घ्या...

पांढरा तांदूळ (व्हाइट राइस) आणि तपकिरी तांदूळ (ब्राउन राइस) यांच्यामध्ये प्रोसेसिंग फरक असतो.

पांढरा तांदूळ पॉलिश केलेला असतो, तो मऊ आणि त्याला हलकी चवही असते. मात्र त्यात पोषक घटक कमी असतात.

तपकिरी तांदळामध्ये फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते.

तपकिरी तांदूळ रक्तातील साखरेची पातळी (ब्लड शुगर) पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत संथ गतीने वाढवतो. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

पांढरा तांदूळ लवकर पचतो आणि शरीराला त्वरित ऊर्जा देतो.

रात्री उशिरा जेवण्याची सवय आरोग्यासाठी घातक; वेळीच व्हा सावध!

Click Here