वेळीच व्हा सावध!
रात्री उशिरा जेवल्याने शरीराची चयापचय क्रिया (मेटाबॉलिज्म) मंदावते.
रात्री उशिरा अन्न सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते.
रात्रीच्या वेळी शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुमारे ५० टक्क्यांपर्यंत कमी होते.
जर सायंकाली ७ वाजेपर्यंत जेवण केले, तर ते लवकर पचते आणि त्येचे ऊर्जेमध्ये रूपांतर होते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कॅलरी दिवसाच्या सुरुवातीला घेणे शरीरासाठी अधिक फायदेशीर असते.
रात्रीचे जेवण हलके आणि लवकर केल्यास वजन नियंत्रणात राहते आणि झोपही चांगली लागते.