एनर्जी लो झाली असेल तर प्या तांदळाची पेज
पूर्वीच्या काळी किंबहूना आजही अनेक घरांमध्ये तांदळाची पेज आवर्जुन केली जाते.
अशक्तपणा, आजारपण, तोंडाची चव जाणे यामध्ये तांदळाची पेज खासकरुन प्यायली जाते.
तांदळाच्या पेजेचे अनेक फायदे आहेत. हे फायदे कोणते ते पाहुयात.
तांदळाच्या पेजेमध्ये काळं मीठ टाकून त्याचं सेवन केलं तर भूक वाढते.
तांदळाच्या पेजेत मध मिक्स करुन प्यायल्यास अशक्तपणा दूर होतो. तांदळाची पेज ही नैसर्गिक एनर्जी बूस्टर आहे.
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर पेजेमध्ये गुळ मिक्स करुन त्याचं सेवन करावं.
पोटाच्या तक्रारींमध्ये तांदळाच्या पेजेमध्ये लिंबाचा रस मिक्स करावा. व त्याचं सेवन करावं.