गुंतवणुकीसाठी योग्य कंपनीचा शेअर नेमका कसा निवडावा?

'पीईजी रेशो' ठरू शकतो गेमचेंजर! जाणून घ्या सविस्तर 

गुंतवणूक करताना कोणत्या कंपनीचा शेअर योग्य किमतीला मिळत आहे, हे ओळखणे नेहमीच आव्हान असते. 

केवळ शेअरची किंमत पाहून निर्णय घेणे चुकीचे ठरू शकते. अशा वेळी 'प्राईस-टू-अर्निंग ग्रोथ' म्हणजे पीईजी रेशो हे  एक प्रभावी साधन आहे.

व्हॅल्यूएशन कसे ओळखावे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील

योग्य मूल्य - जर एखाद्या शेअरचा पीईजी रेशो १ च्या आसपास असेल, तर त्याचे मूल्य योग्य मानले जाते.

स्वस्त शेअर - जर पीईजी रेशो १ पेक्षा कमी असेल, तर तो शेअर भविष्यातील वाढीच्या तुलनेत स्वस्त दरात उपलब्ध आहे असे समजले जाते. अशा शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी असते

महाग शेअर - जर पीईजी रेशो १ पेक्षा जास्त असेल, तर तो शेअर महाग समजला जातो. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असते

Click Here