उन्हाळा सुरु झाला की सतत अन्य थंडगार पदार्थ खावेसे वाटतात. परंतु, बाजारात मिळणारे घातक कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा घरी तयार केलेले हेल्दी ड्रिंक्स कधीही उत्तम.
उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरी कोकम सरबत, लिंबू सरबत, पन्ह असे पदार्थ केले जातात. परंतु, यावेळी तुम्ही शरीराला थंडावा देणारं हेल्दी गुलकंद मिल्क नक्की ट्राय करु शकता.
गुलकंद मिल्क पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो.
गुलकंद मिल्क प्यायल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास दूर होतो.
गुलकंद मिल्क तयार करण्यासाठी १ ग्लास दूध घेऊन त्यात २ चमचे गुलकंद मिक्स करा. हे मिश्रण छान ब्लेंड करा. त्यानंतर त्यात वेलची पूड, खजूर मिक्स करा. अशा प्रकारे तयार होतं गुलकंद मिल्क.
गुलकंद मिल्कमुळे पचनक्रियेच्या समस्याही दूर होतात. तसंच त्यात दूध असल्यामुळे अपचनाचा त्रासही कमी होतो.