दररोज दही-भात खाल्ला तर शरीरात होतील 'हे' मोठे बदल

दही-भात खाल्ल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. 

अनेकदा पोट बिघडलं किंवा तोंडाची चव गेली असेल तर घरातील आई-आजी दहीभात खाण्याचा सल्ला देतात.

अनेक भारतीय घरांमध्ये दही-भात मोठ्या आवडीने खाल्ला जातो. विशेष म्हणजे असा भात खाण्याचे अनेक फायदेदेखील आहेत.

दही आणि भात खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते. ज्यामुळे उन्हाळ्यात होणारे उष्णतेच्या विकारांपासून संरक्षण होतं.

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतडे निरोगी ठेवतात आणि गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम देतात.

दही- भातामध्ये कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वेटलॉस जर्नीमध्ये याचा फायदा होऊ शकतो.

दही-भात खाल्ल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. तसंच मेटाबॉलिझमदेखील सुधारतो.

दही आणि भात दोन्हीमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. हे शरीरातील स्नायूंची दुरुस्ती, वाढ आणि पेशींची देखभाल करण्यास मदत करतात. व्यायामानंतरचे दहीभात खाणे खूप चांगले फायदे देऊ शकते.

दुधी भोपळ्याचा ज्यूस पिण्याचे फायदे ...

Click Here