दुधी भोपळ्याचा ज्यूस पिण्याचे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात सगळ्यांनी तो प्यायलाच हवा.
वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस तसा लोकप्रिय आहे. त्यात कॅलरीज कमी असल्याने वजन वाढत नाही.
हे पेयं शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी गरजेचे आहे. शरीराला थंडावा देणारे असल्यामुळे नक्की प्या.
त्यात भरपूर फायबर असते तसेच जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असते. त्यामुळे हे पेयं रिकाम्यापोटी पिणे फायद्याचे ठरते.
एका मिक्सरच्या भांड्यात दुधी भोपळ्याचे तुकडे घ्यायचे. त्यात लिंबाचा रस घालायचा. थोडा पुदिना घालायचा.
वाटून घ्यायचा आणि मग गाळून घ्यायचा. फक्त हा ज्यूस पिताना जर कडू लागला तर अजिबात पिऊ नका. तयार करताना काळजी घ्या. कडू दुधी चुकूनही वापरु नका.
भोपळा कडू नाही याची मात्र खात्री करुन घ्या, कडू, जास्त निबर झालेल्या भोपळ्याच्या रसाने विषबाधा होऊ शकते.