रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीटीई रेल्वेतून उतरवू शकतो का?

जाणून घ्या...

रेल्वेने प्रवास करण्यासाठी कन्फर्म तिकीट असणे आवश्यक आहे.

वैध तिकिटाशिवाय रेल्वेने प्रवास करणे हा केवळ गुन्हाच नाही, तर असे केल्यास आपल्याला दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो.

अनेकदा लोकांचा असा प्रश्न असतो की, रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास केल्यास टीटीई ट्रेनमधून उतरवू शकतो का?

नियमांनुसार, टीटीई अशा प्रवाशांकडून दंड घेऊ शकतो आणि ठरलेली तिकिटाची किंमत घेऊन नवीन तिकीट तयार करू शकतो.

जर ट्रेन रात्रीच्या वेळी एखाद्या लहान, सुनसान किंवा असुरक्षित स्टेशनवर थांबली असेल, तर तिथे टीटीई तिकीट नसल्याच्या कारणावरून कोणत्याही प्रवाशाला उतरवू शकत नाही.

अशा परिस्थितीत टीटीई प्रवाशाकडून दंड घेऊ शकतो आणि एखाद्या मोठ्या स्टेशनवर उतरवू शकतो.

महत्वाचे म्हणजे, आपण नेहमीच कन्फर्म तिकिटासह प्रवास करायला हवा आणि आणीबाणीच्या स्थितीत टीटीईला भेटून दंडासह तिकीट बनवून घ्यायला हवे.

विनातिकीट प्रवास केल्यास प्रवासाचे पूर्ण भाडे आणि दंड वसूल केला जाऊ शकतो. इतकेच नाही तर तुरुंगवासही होऊ शकतो. अनेक प्रकरणांमध्ये जेल आणि दंड अशा दोन्ही शिक्षाही मिळू शकतात.

पपईच नाही, तर तिचे बी आणि पानेही आहेत खास; जाणून घ्या फायदे

Click Here