जाणून घ्या...
सध्या उन्हाळ्याचा कडाका जबरदस्त वाढला आहे.
अशा स्थितीत उन्हाळ्यात वाहनाचा फ्यूअल टँक फुल करावा की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो.
...तर उन्हाळ्यात वाहनाची इंधन टाकी पूर्ण भरणे, हे पूर्णपणे चुकीचे नाही.
उन्हाळ्यात पेट्रोल आणि डिझेलचे वेगाने बाष्पीभवन होऊ शकते.
टाकी काठोकाठ भरल्याने इंधन बाहेर पसरण्याचा धोका वाढतो.
यामुळे टाकी फुल करताना नोझलवर 'ऑटो-कट'चा आवाज आल्यावर पेट्रोल भरणे थांबवावे.
फ्यूल टँक कधीही झाकणापर्यंत पूर्ण भरू नका, जेणेकरून पेट्रोल पसरण्यास पुरेशी जागा मिळेल.
तसेच शक्य असल्यास सकाळी लवकर किंवा रात्री पेट्रोल भरावे, कारण त्यावेळी तापमान कमी असते.