विक्रोळीत रस्त्यांची अक्षरश: चाळण
By admin | Updated: July 23, 2016 00:00 IST2016-07-23T00:00:00+5:302016-07-23T00:00:00+5:30
खड्डेमय बनलेल्या मुंबापुरीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच विक्रोळी परिसरात देखील रस्ता घोटाळा समोर येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेकडून येथील रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचे एक आमदार आणि दोन नगरसेवक विक्रोळी परिसरात आहेत. एवढी राजकीय वजनदार व्यक्तिमत्त्वे असूनही रस्त्यांची मात्र दुरवस्था आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या रस्त्यांवर तब्बल २८९ खड्डे मोजून काढले