मुंबई - मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथील बसमेंटमध्ये बुधवारी (19 डिसेंबर) आग लागल्याची घटना समोर आली होती. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन विभागाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मरीन ड्राईव्ह परिसरात हे पंचतारांकित हॉटेल असून या हॉटेलमधील खालच्या बाजूस असलेल्या लहान दुकानातून ही आग भडकली होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.