बलात्कारप्रकरणी तरुण अटकेत
By Admin | Updated: August 10, 2015 01:36 IST2015-08-10T01:36:02+5:302015-08-10T01:36:02+5:30
४७वर्षीय महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला नवघर पोलिसांनी अटक केली. प्रशांत कदम असे आरोपी तरुणाचे नाव आहे

बलात्कारप्रकरणी तरुण अटकेत
मुंबई : ४७वर्षीय महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला नवघर पोलिसांनी अटक केली. प्रशांत कदम असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
मुलुंड (पू.) येथील तक्रारदार महिला मुलीसोबत राहते. कदमसोबत महिलेची मैत्री असल्याने तो त्यांचा घरी येत-जात होता. अडचणीच्या वेळेस तक्रारदार महिला त्याला पैसे पुरवत होती. मात्र दिवसेंदिवस कदमची पैशांची मागणी वाढत गेली. यातूनच दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. कदमचे महिलेसोबत शारीरिक संबंध होते. पैसे नाही दिले तर मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी त्याने दिली होती. अखेर कदमच्या रोजच्या त्रासाला कंटाळून महिलेने नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराच्या गुन्ह्याखाली कदमला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे नवघर पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)