आरोग्यासाठी वरदान... फायदे समजल्यावर रोजच प्याल
कोकम सरबत शरीरातील उष्णता कमी करतं आणि नैसर्गिक थंडावा देतं.
कोकममध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवतं, थकवा दूर करून फ्रेश ठेवतं.
कोकम सरबतमध्ये 'हायड्रॉक्सीसिट्रिक ॲसिड' असते, जे भूक कंट्रोल करण्यास मदत करतं.
जेवणानंतर कोकम सरबत किंवा सोलकढी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.