'स्मार्ट' किचन टिप्स; चव होईल एकदम परफेक्ट!
जेवणात अनेकदा मीठ जास्त होतं. अशावेळी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही
जर भाजीत मीठ जास्त झालं असेल, तर त्यात उकडलेला बटाटा टाका. बटाटा अतिरिक्त मीठ शोषून घेतो.
जेवणात दही किंवा क्रीम मिसळल्याने मिठाची चव बॅलन्स होते आणि ग्रेव्हीला छान चव येते.
पिठाचे छोटे गोळे बनवून भाजीत टाकल्याने सुद्धा मिठाचं प्रमाण कमी करता येतं.
लिंबाचा रस टाकल्याने देखील जेवणातील खारटपणा कमी होण्यास मदत होते.
जर भाजी सुकी असेल, तर त्यात थोडा टोमॅटो किंवा कांदा परतून टाकल्यास मिठाचं प्रमाण कमी होईल.