फिट आणि हेल्दी राहायचं... मग आजपासूनच 'हे' करा फॉलो
कॉफी ब्रेक घेण्याऐवजी 'फिटनेस ब्रेक' घ्या. यामध्ये चालणं किंवा डेस्क एक्सरसाइज करा.
अन्न जास्त दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेवू नका. ताज्या भाज्या खा.
प्रवासाला निघण्यापूर्वी घरातून जेवून जा. जंक फूड खाणं टाळा.
फळं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने आहारात फळांचा समावेश करा.
जेवणांच्या मधल्या वेळात भूक लागल्यास चणे, कुरमुरे किंवा खाकरा यांसारखे पदार्थ खा.
जेवण प्रेशर कुकरमध्येच करा. कारण कमी तेलाचा वापर करून पौष्टिक जेवण बनवू शकता.