Join us

५५ दिवस, ४००० नॉटिकल मैल प्रवास; तिन्ही सैन्यातील महिला सैनिकांचा ताफा 'समुद्र प्रदक्षिणा' मोहिमेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:24 IST

1 / 8
या मोहिमेत लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या १० महिला अधिकारी या भारतीय लष्कराच्या स्वदेशी नौका 'त्रिवेणी'द्वारे नऊ महिन्यांत सुमारे ४५ हजार किमीचा प्रवास करणार आहेत.
2 / 8
१० महिला अधिकारी पहिल्यांदाच एकत्र येऊन जगप्रदक्षिणा मोहिमेस प्रारंभ करणार असून 'त्रिवेणी' या नौकेवरून त्या २१ हजार ६०० नॉटिकल मैलांचा प्रवास करतील. या मोहिमेला ११ सप्टेंबरला सुरुवात झाली असून मे महिन्यात तिचा समारोप होईल.
3 / 8
१० महिला अधिकारी पहिल्यांदाच एकत्र येऊन जगप्रदक्षिणा मोहिमेस प्रारंभ करणार असून 'त्रिवेणी' या नौकेवरून त्या २१ हजार ६०० नॉटिकल मैलांचा प्रवास करतील. या मोहिमेला ११ सप्टेंबरला सुरुवात झाली असून मे महिन्यात तिचा समारोप होईल.
4 / 8
ही मोहीम आध्यात्मिक साधना, शिस्त आणि इच्छाशक्तीची चाचणी आहे. आपल्या महिला अधिकारी अडचणींना सामोरे जातील; पण त्यांच्या दृढनिश्चयाची ज्योत सर्व संकटांवर मात करेल. तुम्ही जे कार्य करणार आहात, ते भारताच्या इतिहासातील असे क्षण आहेत, जे पुढील पिढ्यांना अभिमानाने आठवण करून देतील, असं राजनाथ सिंह म्हणाले.
5 / 8
त्रिवेणी ही ५० फुटांची स्वदेशी नौका पुदुच्चेरी येथे तयार करण्यात आली असून, ती आत्मनिर्भर भारताचे प्रतीक आहे. नारीशक्ती, आत्मनिर्भर भारत, तीनही दलांतील ऐक्य आणि भारताच्या लष्करी कुटनीतीचे प्रतीक असल्याचे सिंह म्हणाले.
6 / 8
देशाच्या शौर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक ठरणाऱ्या या महिला अधिकारी समुद्र प्रवासाद्वारे जागतिक स्तरावर भारताचा सन्मान उंचावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या अभियानात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अर्जेंटिना व केपटाउन या ठिकाणी काही काळ थांबून पुढे जातील.
7 / 8
अडीच वर्षांपासून त्यांचे खडतर प्रशिक्षण सुरू होते. त्यात मुंबई ते गोवा, मुंबई ते सेशेल्स दरम्यान त्यांनी सेलिंग केले आहे. या मोहिमेदरम्यान सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली. या मोहिमेत सहभागी होणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
8 / 8
या मोहिमेचे नेतृत्व मराठमोळ्या लेफ्टनंट कर्नल अनुजा वरूडकर करत आहेत. यामध्ये स्कॉडून लीडर श्रद्धा राजू, स्कॉडून लीडर आरुवी जयदेव, मेजर ओमिता दलवी, स्कॉडून लीडर वैशाली भंडारी, कॅप्टन प्राजक्ता निकम, लेफ्टनंट कमांडर प्रियांका गुंसाई, मेजर करमजीत कौर, मेजर दौला बुटोला, विंग कमांडर विभा सिंग या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये पाच लष्करी, चार हवाई दल व एक नौदल अधिकारी आहेत. यामधील तीन अधिकारी महाराष्ट्रातील आहेत.
टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल