बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 22:16 IST
1 / 5दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेते अमिताभ बच्चन, संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थित टीझर लॉंच करण्यात आला. 2 / 5हा सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे.3 / 5बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार आहे. यावेळी टीझर लॉंचिंगवेळी नवाजुद्दीन सिद्दीकी उपस्थित नव्हता. 4 / 5र हा सिनेमा फक्त माझ्या वडिलांवर नाही, तर ज्या व्यक्तीनं इतिहास घडवला त्या व्यक्तीवर आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 5 / 5बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य तीन तासांत सामावू शकत नाही, त्यासाठी खरंतर वेबसिरीज काढली पाहिजे, असे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितले.