Join us  

डॉ. बाबासाहेब अन् ठाकरे कुटुंबीयांचा विशेष ऋणानुबंध, राज ठाकरेंनी सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 5:23 PM

1 / 11
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगभरात घराघरात साजरी केली जात आहे.
2 / 11
कोरोना व्हायरसमुळे भलेही बाहेर कार्यक्रम करता आले नसतील. पण घरात लोक शांततेत जयंती साजरी करत आहेत.
3 / 11
डॉ. बाबासाहेबांबद्दलच्या काही खास गोष्टी, आठवणी आणि लेख सोसल मीडियातून शेअर केले जात आहेत. तसेच, सोशल मीडियातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.
4 / 11
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब यांच्या कार्याची महती सांगत त्यांना विनम्र अभिवादन केलंय
5 / 11
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे. त्यावेळी, ठाकरे कुटुंबीयांशी त्यांची असलेली जवळीकही व्यक्त केली.
6 / 11
राज यांनी फोटो शेअर करत, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बाबासाहेबांनी निर्वावाद पाठिंबा दर्शवल्याचं सांगितलं.
7 / 11
आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या आवाहनाबद्दल बाबासाहेबांची भूमिका सकारात्मक होती.
8 / 11
माझे वडिल श्रीकांत ठाकरे यांनीही बाबासाहेबांच्या प्रकाशनांसाठी काही व्यंगचित्रे रेखाटली होती, अशी आठवण राज यांनी सांगितली.
9 / 11
ठाकरे कुटुंबीयांचा डॉ. बाबासाहेब यांच्याशी असलेल्या ऋणानुबंध माझ्यासाठी निश्चित प्रेरणादायी आहे, असे राज यांनी म्हटलंय.
10 / 11
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासुर्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे म्हणत राज यांनी बाबासाहेबांना जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे.
11 / 11
डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीदिनी आज सोशल मीडियावर जयभीम आणि भीमजयंती हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरTwitterट्विटर