1 / 5बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यासाठी मुंबईतील तिच्या निवासस्थानी लगीनघाई सुरू झाली आहे.2 / 5सोनम कपूर ही अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. सध्या अनिल कपूरच्या घराला वेगळाच साज चढला आहे. सोनमची आई सुनिता यांच्याकडून जातीने घराच्या सजावटीवर लक्ष ठेवले जात आहे.3 / 5सोनम कपूर तिचा बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. 4 / 5‘लग्नकार्यामध्ये अवास्तव खर्च करणार नाही’ असे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरने सांगितले होते. त्यानंतर तिच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.5 / 5सोनमने लग्नामध्ये जास्त खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाला प्रियकर आनंद आहुजा आणि घरातील अन्य सदस्यांनीही पाठिंबा दिला.