Join us  

मुंबईतील पॉवरकटने यंत्रणा कोमात, ट्विटवरुन मुंबईकर जोमात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 1:01 PM

1 / 13
मुंबईत आधीच लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच, आज अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने मुंबईकर जाम वैतागले आहेत.
2 / 13
लाईट गेल्याने मुंबईतील अत्यावश्यक सेवा थांबल्या असून मुंबईकरांनी ट्विटरवरुन आपला रोष व्यक्त केला आहे. ट्विटरवर मुंबईतील वीजखंडीत झाल्यानंतर अनेक ट्विट व्हायरल झाले आहेत.
3 / 13
मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
4 / 13
ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.
5 / 13
भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले
6 / 13
दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या
7 / 13
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील बत्ती एकाएकी गुल झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
8 / 13
मुंबईतील वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर मोबाईल फुल्ल चार्ज असल्याचं सांगत, आपल्याला काही टेन्शन नसल्याचं या मिम्समधून सांगितलं
9 / 13
फिर हेरा फेरी चित्रपटातील हा डायलॉग असून वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर मिम्स व्हायरल.
10 / 13
कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला असून इकडे वीजपुरवठा खंडीत झालाय, पण सरकार कंगना कंगना करण्यात व्यस्त आहे, असं कंगनानं म्हटलंय.
11 / 13
गेल्या 17-18 वर्षात पहिल्यांदाच असं घडल्याचं सांगणारं हे ट्विट
12 / 13
अर्णब गोस्वामीच्या रिपल्बिक टीव्हीला बंद करण्याचा हा दुसरा पर्याय म्हणजे वीज पुरवठा खंडीत करणे हे होय.
13 / 13
अरविंद केजरीवाल यांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुंबई पॉवरकट हा हॅशटॅग ट्रेंन्ड करत आहे
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलelectricityवीजMumbaiमुंबईTwitterट्विटर