Join us  

Photos: 'विदेशात अडकलेल्यांसाठी होत्या सुषमाजी, तर देशातील मजुरांसाठी सोनूजी'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 5:02 PM

1 / 20
लॉकडाऊनमुळे हजारोंच्या संख्येतील मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, अशा अवस्थेत या मजूरांनी शेकडो किमीची पायपीट करत आपल्या मूळ गावाचा रस्ता धरला आहे.
2 / 20
सरकार या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे प्रयत्न करतेय. पण या गरीब मजुरांचा धीर आता सुटत चाललाय. कसेही करून लवकरात लवकर त्यांना आपल्या घरी परतायचे आहे. या सगळ्यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या मजुरांच्या मदतीसाठी धावला आहे. त्याने या मजूरांसाठी काही दिवसांपासून खास बस सेवा सुरू केली असून तो त्यांना त्यांच्या घरी पोहोचवत आहे.
3 / 20
या मजुरांच्या प्रवासाचीच नाही तर त्यांच्या जेवणाची सोयही सोनू करत आहे. त्यामुळे अनेकजण आजही सोनूकडे घरी परतण्यासाठी ट्विटरवरुन मदत मागत आहेत.
4 / 20
सोशल मीडियाद्वारे सोनूकडे मदत मागितली जात असून त्यास प्रतिसाद देत सोनूने स्थलांतरींना घरी पोहोचविण्याचं काम हाती घेतलं आहे.
5 / 20
सोनूच्या या कामाचं सध्या सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत असून कपिल शर्मा, काँग्रेस नेते आणि मंत्री आस्लम शेख व केआरकेनेही सोनूच्या या कामाचं कौतुक केलंय.
6 / 20
नेटीझन्सने सोनूच्या या कामाचं कौतुक करताना, कुणी कविता केल्या आहेत, कुणी टॅगलाईन दिल्या आहेत. तर, कुणी स्पायजरमॅन, सुपरमॅनपेक्षाही हा मॅन ग्रेट असल्याचं म्हटलं आहे.
7 / 20
ट्विटरवरील एका युजर्सने थेट माजी परराष्ट्रमंत्री आणि दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्याशी सोनूची तुलना केली आहे. विदेशात अडकलेल्या भारतीयांना एका ट्विटवर भारतात आणण्यात सुषमाजी पुढे होत्या.
8 / 20
तर, देशात अडकलेल्या भारतीयांना त्यांच्या गावी-घरी पोहोचविण्यासाठी एका ट्विटवर सोनू सूद प्रयत्न करत असल्याचे या ट्विटर युजर्संने म्हटले आहे.
9 / 20
सोनू सूद शक्य तितक्या ट्विटर्स युजर्संना रिप्लाय देत असून पत्ता आणि फोन नंबर मागवून घेत, मुंबईत अडकलेल्या स्थलांतरीत मजूरांना गावी पोहोचविण्याचं काम करत आहे.
10 / 20
बॉक्स ऑफिसच्या ट्विटर हँडलवरुनही सोनूच्या कामचं कौतुक करण्यात आलंय, तर सोनूला बॉलिवूडचा बाहुबली असं म्हटलंय
11 / 20
काँग्रेस नेते आणि मंत्री आस्लम शेख यांनीही सोनूच्या कामाचं कौतुक करताना, मी तुझ्या कामाने प्रेरित झाल्याचं म्हटलं आहे.
12 / 20
बाहुबली चित्रटातील एका दृश्याचं मिम्स बनवून सोनच्या कामचां कौतुक करताना त्याला भगवान असं म्हटलंय
13 / 20
आपल्या गावी निघालेल्या स्थलांतरीत मजुरांनी सोनू सुदचे आभार मानले आहेत, त्यावर खुश रहो मेरे भाई, असे सोनूनं म्हटलंय
14 / 20
बंदे मे है दम... वंदे मातरम... असं ट्विट करत एका ट्विटर युजर्सने मस्त टॅगलाईन दिलीय. तर अमेझॉन व फ्लिकार्टपेक्षाही फास्ट अन मोफत सेवा देत असल्याचं म्हटलंय
15 / 20
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या घोषणेशी जोडत तुम मुझे एड्रेस दो, मै तुम्हे पहुंचाा दुँगा... अशी टॅगलाईन एका युुजर्सने बनवलीय
16 / 20
कॉमेडियन कपिल शर्मानेही लव्ह यू पाजी म्हणत तुमच्या कामाचा अभिमान वाटतो, असं म्हटलंय
17 / 20
एका ट्विटर युजर्संने थेट माजी पररराष्ट्रमंत्री आणि दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्याशी सोनूची तुलना केली आहे
18 / 20
आज गुगलवर सोून सूदला सर्वाधिक सर्च केलं जातंय, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांऐवजी घरी जाण्यासाठी सोनूकडे पाहिलं जातंय, असे केआरकेने म्हटलं आहे
19 / 20
आज गुगलवर सोून सूदला सर्वाधिक सर्च केलं जातंय, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांऐवजी घरी जाण्यासाठी सोनूकडे पाहिलं जातंय, असे केआरकेने म्हटलं आहे
20 / 20
मनाने आभाळाएवढं काम करतोय हा माणूस, दिवसाताून एकदा सोनूच्या अकाऊंटवर गेल्यास बरं वाटतंय, अस म्हटलं नामेदव यांनी
टॅग्स :Sonu Soodसोनू सूदMigrationस्थलांतरणcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईSushma Swarajसुषमा स्वराज