Join us  

मुंबईत येण्यासाठी फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज; कंगनाचा शिवसेनेला टोला

By मोरेश्वर येरम | Published: December 29, 2020 2:08 PM

1 / 8
अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत आली आहे. तिनं मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कंगना यावेळी मराठमोळ्या वेशभूषेत पाहायला मिळाली.
2 / 8
कंगनाने मंगळवारी सकाळी १० वाजता सिद्धिविनायक मंदिरात येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी दिली.
3 / 8
कंगनाने हिरव्या रंगाची पैठणी साडी परिधान केली होती. पारंपारिक साडी कंगनानं मॉर्डन पद्धतीनं नेसली होती.
4 / 8
सिद्धिविनायक मंदिराला भेट दिल्यानंतर कंगानाने प्रसार माध्यमांशीही संवाद साधला.
5 / 8
कंगनाने मंदिरातून बाहेर आल्यानंतर 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला. त्यानंतर अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोलाही लगावला.
6 / 8
'मुंबईत येण्यासाठी मला फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज आहे. इतर कुणाच्या परवानगीची आवश्यकता नाही', असं कंगना म्हणाली.
7 / 8
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर कंगनाविरोधात मोठा वाद निर्माण झाला होता.
8 / 8
कंगनाच्या या विधानानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी तिच्यावर टीका केली होती. कंगना आणि मुंबई महानगरपालिकेतील वादही यानंतर गाजला.
टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतSiddhivinayak Ganapati Templeसिद्धिविनायक गणपती मंदिरShiv Senaशिवसेना