Join us  

PHOTOS: विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अमित ठाकरे थेट दादर चौपाटीवर, स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 1:36 PM

1 / 10
मुंबईतील चौपाट्यांवर गणेश विसर्जन झालं की दुसऱ्या दिवशीचं चौपट्यांवरीस चित्र मन विषण्ण करणारं असतं. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून मुंबई, रायगड आणि रत्नागिरीच्या समूद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं.
2 / 10
मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड येथे; तर रत्नागिरीत मांडवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसोबत समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवली.
3 / 10
मुंबईतील दादर चौपाटीवर राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनीही स्वच्छता मोहित सहभाग घेतला. यावेळी अमित ठाकरे यांनी स्वत: समुद्र किनाऱ्यांवर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष गोळा केले तसंच निर्माल्य जमा करुन ते एका ठिकाणी जमा करण्यास हातभार लावला.
4 / 10
रत्नागिरीत मांडवी येथेही सकाळी ८ ते १० दरम्यान पक्षातर्फे राबवण्यात आलेल्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत पक्षाचे पदाधिकारी, असंख्य नागरिक तसंच विद्यार्थी सहभागी झाले होते.
5 / 10
मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जनानंतर समुद्राच्या भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपवले.
6 / 10
ज्या पद्धतीनं आपण मोठ्या जल्लोषात गणरायाचं आगमन आणि विसर्जन करतो. त्याच उत्साहानं आपण निसर्गाचीही काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणपूरक गणेशोत्सावाकडे वळलं पाहिजे आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवले पाहिजेत. ही आपलीच जबाबदारी आहे, असं अमित ठाकरे यांनी आवाहन केलं.
7 / 10
घरगुती बाप्पांच्या विसर्जनासाठी जास्तीत जास्त लोकांनी कृत्रित तलाव आणि हौदांचा वापर करायला हवा. जेणेकरुन समुद्रकिनारे स्वच्छ राहतील. आता बहुतांश ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करुन दिले जातात, असंही ते म्हणाले.
8 / 10
पर्यावरणप्रेमींसह अमित ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला.
9 / 10
अमित ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणी हेसुद्धा समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.
10 / 10
अमित ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणी हेसुद्धा समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.
टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेGanesh Mahotsavगणेशोत्सव