Join us  

'नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय', मुंबईत शिवसेनेची महागाईविरोधात निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 4:37 PM

1 / 5
मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली होती. शिवसेनेचे मुंबईतील 12 ठिकाणी मोर्चे निघाले होते.
2 / 5
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई याला शिवसेना विरोध दर्शवला.
3 / 5
''नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय'', अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून यावेळी देण्यात आल्या. 'एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला', अशा घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी अक्षरशः टोक गाठल्याचेही यावेळी पाहायला मिळाले.
4 / 5
बोरिवलीत शिवसेनेच्या रणरागिणींनी सरकारची प्रेतयात्रा काढत निषेध नोंदवला. या आंदोलनात आमदार प्रकाश सुर्वे, विभागप्रमुख प्रकाश कारकर, प्रभारी विभागप्रमुख विलास पोतनीस, महिला विभागसंघटक रश्मी भोसले यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल पार्क, बोरीवली पूर्व येथे उग्र आंदोलन करण्यात आले.
5 / 5
महागाईविरोधात निदर्शने करणा-या शिवसैनिकांना ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आमदार नीलम गो-हे , आमदार अजय चौधरी, आशिष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर , माजी महापौर स्नेहल आंबेकर, अरविंद भोसले, माजी आमदार दगडू सकपाळ यांचा समावेश होता.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका