Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील सर्वात मोठे 55 सीटर अत्याधुनिक दुमजली जम्बो शौचालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 22:53 IST

1 / 5
ज्वालामुखीच्या उद्रेकातून सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या २०० फूट उंचीच्या बेसाल्ट टेकडीसाठी प्रसिद्ध असलेली अंधेरी पश्चिन गिल्बर्ट हिल येथील झोपडपट्टी राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्वात मोठे 55 सीटर पहिले दुमजली जंबो शौचालय उभे केले आहे.
2 / 5
त्यामुळे हा परिसर आता हागवणदारीमुक्त झाला आहे. याठिकाणी इंग्लिश,भारतीय शोचकूप आणि अपंगांसाठी विशेष सुविधा या ठिकाणी करण्यात आली या 55 शौचकूप अशा या अत्याधुनिक शौचालयामध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन तसेच वापरलेले सॅनिटरी पॅड बर्निंग मशीन बसवण्यात आले आहे.या शौचालयाचा नुकताच लोकार्पण सोहळा माजी केंद्रिय मंत्री गुरूदास कामत यांच्या हस्ते करण्यात आला.
3 / 5
काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका मेहर मोहसीन हैदर यांनी शौचालयाची संकल्पना पालिका प्रशासनाकडे मांडली. त्या म्हणाल्या की, माझ्या वॉर्ड क्रमांक ६६ ची लोकसंख्या सुमारे १ लाख इतकी आहे. त्यापैकी ६५ हजार नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांच्या सोयीसाठी आम्ही अशाप्रकारची ११ शौचालये बांधली आहेत.या शौचालयाचा वरचा मजला हा पुरुषांसाठी तर खालील मजला स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
4 / 5
यावेळी माजी नगरसेवक मोहसिन हैदर (परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर, पालिका उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विजय बालमवार,सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड,साहाय्यक अभियंता-परिरक्षण उमेश बोडके आणि स्थानिक नागरिक यावेळी मोठया संख्येने हजर होते.
5 / 5
या शौचालयामुळे हा परिसर हागणदारीमुक्त होणार असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे.प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की ''स्लम सॅनिटेशन कार्यक्रमांतर्गत या शौचालयासाठी १.२ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. या शौचालयाच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून एखाद्या कुटुंबाला याचा लाभ घ्यायचा असेल तर २५-३० रुपये आकारण्यात येतील. या शौचालयाची स्वच्छता तसेच देखभालीसाठी एखाद्या संस्थेला काम देण्यात येईल.
टॅग्स :Mumbaiमुंबई