Join us  

Mukesh Ambani's Unknown Sister: मुकेश अंबानींच्या बहीणीबाबत फार कमी लोक जाणतात; धीरुभाई असतानाच मुंबई सोडलेली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 7:28 PM

1 / 9
धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांची दोन अपत्येच आपणा सर्वांना माहिती आहेत. एक अनिल अंबानी आणि दुसरे मुकेश अंबानी. पण धीरुभाईंना एकूण चार मुले होती. मुकेश अंबानी, अनिल अंबानी, दीप्ती साळगावकर आणि नीना कोठारी. यापैकी नीना कोठारी यांनाही काहीजण ओळखत असतील.
2 / 9
अनिल आणि मुकेश हे दोघे प्रसिद्धीच्या झोतात असतात पण दीप्ती साळगावकर या कुठेच दिसत नाहीत. नीना कोठारी अजूनही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत असतात. मग दीप्ती साळगावकर काय करतात, कुठे असतात? जाणून घेऊया...
3 / 9
धीरूभाई अंबानी यांचे कुटुंब 1978 मध्ये उषा किरणमध्ये राहत होते, जी त्यावेळची एकमेव उंच इमारत होती. ते 22 व्या मजल्यावर राहत होते. त्यावेळी साळगावकर कुटुंब चौदाव्या मजल्यावर राहत होते. दोन्ही कुटुंबांमध्ये छान मैत्री होती. या मैत्रीचे रुपांतर अंबानींनी नात्यामध्ये केले.
4 / 9
खरेतर धीरुभाईंची मुलगी दीप्ती आणि साळगावरांचा मुलगा दत्तराज एकमेकांच्या प्रेमात होते. 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 31 डिसेंबर 1983 रोजी लग्नाचा निर्णय घेतला. धीरुभाईंनी देखील या दोघांच्या लग्नाला आढेवेढे न घेता होकार दिला.
5 / 9
दीप्ती आणि दत्तराज यांना दोन मुले आहेत. विक्रम साळगावकर आणि इशेता साळगावकर अशी त्यांची नावे आहेत. लग्नानंतर दीप्तीला गोव्यात शिफ्ट व्हावे लागले. दीप्ती ही मुंबईची मुलगी होती आणि तिला सुरुवातीला गोव्यात जुळवून घेणं अवघड गेले.
6 / 9
'1983 मध्ये जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा गोव्यात काहीही नव्हते आणि मला आठवते की मी माझ्या वडिलांना याबद्दल जेव्हा सांगायचे तेव्हा ते तू ते बदल असे म्हणायचे. वडिलांनी आमच्याकडे सॅटेलाईट डिश बसविली होती जेणेकरून मी टीव्ही पाहू शकेन. एक फॅक्स मशीन दिली होती. ते रोज मला फॅक्स करायचे. ते असे दिवस होते की तेव्हा गोव्याच फॅक्स मशीन्स नव्हत्या'' असे दीप्ती यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते.
7 / 9
गोव्यातील त्यांच्या वडिलोपार्जित वाड्यात त्या राहतात. या वाड्याचे नाव हिरा विहार आहे. कँडोलिम येथे त्यांच्या मालकीचे घर आहे जे समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ आहे. या दोन मालमत्तेव्यतिरिक्त, त्यांच्याकडे पणजीममध्ये एक वैयक्तिक घर देखील आहे जे एका उंच कड्यावर आहे आणि समुद्राची विहंगम दृश्ये पाहता येतात.
8 / 9
दत्तराज साळगावकर हे व्ही.एम.साळगावकर ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक आहेत जे लोहखनिजाचे उत्खनन, प्रक्रिया आणि निर्यात, रिअल इस्टेट, आरोग्य सेवा, शेती यासह इतर व्यवसाय करतात. तर दीप्ती या गृहीणी आहेत.
9 / 9
विक्रम साळगावकर हा व्हार्टन बिझनेस स्कूलमधून पदवीधर आहे, तर इशेता पत्रकारिता आणि कला क्षेत्रात आहे. नीरव मोदीचा धाकटा भाऊ, नीशल मोदी याच्याशी तिचे २०१६ मध्ये लग्न झाले आहे. इशेता अनेकदा ईशा अंबानी आणि श्लोका मेहता यांच्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसते.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्स