Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा अंबानी-आनंद पिरामल यांचा 452 कोटींचा थ्रीडी बंगला, फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 20:24 IST

1 / 7
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांना तिच्या सासरच्यांनी लग्नात एक आलिशान बंगला भेट दिला होता. या बंगल्याचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. या बंगल्याची किंमत कोट्यवधीत आहे. तसेच, हा थ्रीडी बंगला आहे.
2 / 7
ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद पिरामल यांना सासरे अजय पिरामल यांनी लग्नात भेट म्हणून 452 कोटी रुपयांचा आलिशान बंगला दिला होता. दरम्यान, ईशा अंबानी यांचे वडील मुकेश अंबानी यांच्या मालकीची एंटीलिया इमारत आहे. जी अजूनही जगातील सर्वात महागडी इमारत असल्याचे म्हटले जाते.
3 / 7
ईशा अंबानींचा बंगला सुद्धा थ्रीडी टेक्नॉलॉजीने बनलेला आहे, जो 11 मीटर उंच आणि 50000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला पॅलेस आहे. ईशा अंबानींचा हा बंगला मुंबईतील वरळी येथे आहे.
4 / 7
एवढेच नाही तर या बंगल्यामधून अरबी समुद्र आणि सी लिंक ब्रिजचे दृश्यही पाहता येते. तसेच, ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांनी या बंगल्याचे नाव गुलिटा ठेवले आहे.
5 / 7
एवढेच नाही तर या बंगल्यामधून अरबी समुद्र आणि सी लिंक ब्रिजचे दृश्यही पाहता येते. तसेच, ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांनी या बंगल्याचे नाव गुलिटा ठेवले आहे.
6 / 7
गुलिटा या बंगल्याचे बांधकाम अजय पिरामल यांनी 2012 मध्येच सुरू केले होते. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नापर्यंत या बंगल्याचे काम सुरू होते. नुकतेच दोघेही या नवीन आलिशान बंगल्यात शिफ्ट झाले आहेत.
7 / 7
या बंगल्याचे इंटिरिअर खूपच शानदार आहे. प्रत्येक मजल्यावर खास खोल्या बनवण्यात आल्या असून उत्तम फर्निचरिंग करण्यात आले आहे. खोल्या आणि हॉल प्राचीन झुंबरांनी सजवलेले आहेत. दिसायला अतिशय सुंदर असण्यासोबतच ते मौल्यवानही आहे. (सर्व फोटो - Instagram)
टॅग्स :Isha Ambaniईशा अंबानीanand piramalआनंद पिरामलMukesh Ambaniमुकेश अंबानी