Join us  

Mansukh Hiren: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गूढ आणखी वाढलं; अहवालातून नवीन माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 3:26 PM

1 / 7
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ते मनसुख हिरेन हत्या या दोन प्रकरणांमुळे राज्याच्या पोलीस दलात आणि राजकारणात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणात आतापर्यंत ६ लोकांना अटक केली आहे. यात ४ पोलीस अधिकारी जे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि एक निलंबित कॉन्स्टेबल, एक क्रिकेट बुकींचा समावेश आहे.
2 / 7
५ मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता. त्यावेळी हिरेन यांचा चेहरा मंकी कॅपने झाकलेला होता तसेच त्यांच्या तोंडातून अनेक रुमाल बाहेर काढण्यात आले होते. तेव्हा प्रथमदर्शनी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला होता.
3 / 7
गेल्या काही महिनांपासून मनसुख हिरेन प्रकरणी तपास सुरु आहे. मात्र या प्रकरणातील गूढ अजूनही कायम आहे. मात्र अहवालातून आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे.
4 / 7
मनसुख हत्येचा तपास दहशतवाद विरोधी पथक करत असताना मानेंची काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेंना एनआयएने अटक केली आहे.
5 / 7
मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना कांदिवली क्राईम ब्रांचमधून तावडे नावाच्या पोलिसाचा फोन आला असल्याचा दावा केला होता. त्यानंतर चौकशीसाठी पतीला बोलावलं म्हणून गेले ते परत आलेच नाही, असं त्यांनी सांगितलं होतं.
6 / 7
मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झालेला नाही. मनसुख यांच्या शरीरात कोणतेही विषद्रव्य आढळले नसल्याचे अहवालातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मनसुख हिरेन यांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत तपास यंत्रणा पुन्हा संभ्रमात पडले आहेत.
7 / 7
सचिन वाझेंचे सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना ११ एप्रिलला NIA कडून अटक करण्यात आली. अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरण प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. काजी यांची अनेक वेळा एनआयए अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएने काझी यांची चौकशी सुरु केली होती.
टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणPoliceपोलिसthaneठाणे