Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींचे देवदर्शन; आधी 'बाप्पा मोरया', नंतर 'जय श्री कृष्ण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 20:20 IST

1 / 6
मुकेश अंबानी यांनी मंगळवारी आपला होणार जावई आणि कुटुंबीयांसह मुंबईतील इस्कॉन मंदिराला भेट दिली.
2 / 6
मुंबापुरीमध्ये सध्या केवळ बॉलिवूडची 'मसकली गर्ल' सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या विवाहाची तर दुसरीकडे देशातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंबाची लाडकी लेक ईशा अंबानी व आनंद पिरामल यांच्या साखरपुड्याचीच चर्चा आहे.
3 / 6
आनंद हा पिरामल समूहाचे संस्थापक अजय पिरामल यांचा चिरंजीव असून या दोन कुटुंबांमधील चार दशकांपासूनच्या मैत्रीचं आता नात्यात रूपांतर होतंय. रिलायन्स उद्योगसमूहाने औपचारिक पत्राद्वारे या लग्नाची घोषणा केली आहे.
4 / 6
यावेळी मुकेश अंबानी, नीता अंबानी, ईशा अंबानी, अनंत अंबानी, आनंद पिरामल हे सर्वजण एकत्र पाहायला मिळाले.
5 / 6
महाबळेश्वरमधील एका मंदिरात आनंदने ईशाला लग्नाची मागणी घातली होती. ईशाने त्याला होकार दिल्यानंतर, दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी सहभोजन करून हा आनंद साजरा केला होता. मार्च महिन्यात आकाश अंबानीचा साखरपुडा श्लोका मेहता हिच्याशी झाला होता.
6 / 6
धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असल्यापासून या दोघांची मैत्री होती आणि हळूहळू तिचं रूपांतर प्रेमात झालं होतं. श्लोका ही हिरेव्यापारी रसेल मेहता यांची धाकटी मुलगी आहे. ती लवकरच अंबानी कुटुंबाची सून होईल आणि आनंद पिरामल हा अंबानींचा जावई. त्यामुळे 'अँटिलिया'मध्ये येत्या काळात दोन लग्नांची धामधूम पाहायला मिळेल.
टॅग्स :Isha Ambaniईशा अंबानीMumbaiमुंबई