Join us  

भन्नाट! मुंबईत भारतीय रेल्वेचं पहिलं Pod Hotel सुरु; फक्त ९९९ रुपयांत घ्या लग्झरी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 12:17 AM

1 / 8
भारतीय रेल्वेकडून मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर पहिल्या पॉड हॉटेलची सुरुवात करण्यात आली आहे. जपानमध्ये पॉड हॉटेलची संकल्पना पुढे आली होती. त्यानंतर इतर देशांतही ही संकल्पना राबवण्यात आली. भारतात पहिल्यांदाच रेल्वेने पॉड हॉटेलची सुरुवात करत प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.
2 / 8
आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या पॉड रुममध्ये एका प्रवाशाला १२ ते २४ तास थांबण्याची सोय आहे. याठिकाणी १२ तासांसाठी तुम्हाला ९९९ रुपये तर २४ तासांसाठी १९९९ रुपये मोजावे लागतील. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधा पाहता हे दर कमी असल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे.
3 / 8
रेल्वेनुसार, प्रायव्हेट पॉडचं भाडे १२४९ ते २४९९ रुपयांपर्यंत असते. जर कुणीही शॉर्ट बिझनेस ट्रीपसाठी मुंबईला येणार असेल किंवा मुंबईत फिरायचं असेल तर त्यांच्यासाठी रेल्वेचं हे पॉड हॉटेल चांगला पर्याय ठरू शकतो. रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडिया पेजवरुन या वर्ल्ड क्लास पॉड हॉटेलचे काही फोटो शेअर केले आहेत.
4 / 8
IRCTC अधिकाऱ्यांनुसार, मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये पहिल्या मजल्यावर या पॉड हॉटेलची सुरुवात केली आहे. याठिकाणी ४८ पॉड रुम आहेत. त्याची लांबी ७ फूट आणि उंची ४ फूट इतकी आहे. पॉड रुममध्ये आरामदायी बेड उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
5 / 8
जगातील पहिल्या पॉड हॉटेलची सुरुवात जपानमध्ये झाली होती. त्यानंतर जपान, रशिया, यूएस, नेदरलंड, सिंगापूर आणि मलेशिया इथं मोठ्या प्रमाणात पॉड हॉटेल सुरु करण्यात आले. मुंबई सेंट्रलवर सुरु करण्यात आलेले अर्बनपॉड हे भारतातील पहिलं पॉड हॉटेल आहे.
6 / 8
पॉड म्हणजे एका कॅप्सुलच्या आकाराची रुम असते. त्यात एअरकंडिशन असतं. वायफाय, चार्जर यासारख्या सुविधा असतात. मुंबईतील या पॉड हॉटेलला ४ कॅटेगिरीत विभागलं आहे. ज्याची किंमत वेगवेगळी आहे. त्यात क्लासिक पॉड, एक्सक्लूसिव लेडिज पॉड, सूटेड पॉड यांचा समावेश आहे.
7 / 8
हॉटेलच्या कॉमन एरियामध्ये लोकांना बसण्याची सुविधा करण्यात आली आहे. याठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. पॉड हॉटेलच्या रुममध्ये बाथरुमची सोय नसेल. याठिकाणी सॅटेलाईट टीव्ही, वायफाय. रुमच्या बाहेर लगेच ठेवण्यासाठी लॉकर, USB पोर्ट यासारख्या सुविधा आहेत.
8 / 8
पॉड हॉटेलमध्ये २ बिझनेस सेंटर डेस्कही उपलब्ध आहेत. ज्याठिकाणी कॉफीसोबत काम करु शकता. या हॉटेलच्या कैफेटिरियामध्ये रात्री १० वाजेपर्यंत जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. IRCTC नं ९ वर्षाच्या कालावधीसाठी पीओडी कॉन्सेप्ट रिटायरिंग रुम बनवली आहे.
टॅग्स :railwayरेल्वे