अग्निशमन दलाची उंची आता ८१ मीटरपर्यंत, पंचविसाव्या मजल्यावरील आग विझवणे शक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 16:42 IST
1 / 6उत्तुंग इमारतींमध्ये आग लागण्याची घटना वारंवार घडत असल्याने अग्निशमन दलापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे पंचविसाव्या मजल्यापर्यंत पोहोचून आग विझविणारी अत्याधुनिक शिडी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. (सर्व फोटो - सुशिल कदम)2 / 6या शिडीची उंची तब्बल ८१ मीटर आहे. याशिवाय अद्ययावत सहा फायर इंजीन, १७ जलद प्रतिसाद वाहनांनी अग्निशमन दल सुसज्ज बनले आहे.3 / 6अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या वॉल थ्रॉट नोझलचा वापर करून भिंतीच्या पलीकडील आग भिंतीमध्ये नोझल टाकून विझवता येणार 4 / 6यामुळे इमारतीच्या आत प्रवेश न करता आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे.5 / 6हाय प्रेशर गनच्या माध्यमातून आगीवर पाण्याचा फवारा करता येणार आहे. शिवाय कुठेही नेता येणारी पोर्टेबल रिचार्जेबल लाइट सुटकेस उपलब्ध करून देण्यात आली आहे.6 / 6आग आणि धुरामध्ये काम करण्याचे कौशल्य शिकवणारे प्रशिक्षण केंद्रही मुंबई अग्निशमन दलाच्या वडाळा कमांड सेंटरमध्ये सुरू करण्यात आले. या नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक या शिडीच्या लोकार्पण कार्यक्रमात करण्यात आले