पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 14:57 IST
1 / 6 एकेकाळी मुंबईतील अंडरवर्ल्डवर दरारा गाजवणारा पहिला डॉन हाजी मस्तान मिर्झा यांची मुलगी हसीन मिर्झा हिने रडत रडत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे न्याय मागितला आहे. आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिने केला आहे. आठ लग्ने करणारा माझ्याच संपत्तीतून पैसे कमावत असल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. 2 / 6वडिलांच्या मृत्यूनंतर (१९९४) आपले आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे सांगत, हसीन यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी उघड केली आहे. हाजी मस्तान याच्या निधनानंतर आईने आपला निकाह नासिर हुसैन नावाच्या व्यक्तीशी लावून दिला. १२ वर्षांची असताना आपल्यावर बलात्कार, मारहाण आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. 3 / 6एका शक्तिशाली अंडरवर्ल्ड डॉनची मुलगी असूनही, हसीन मिर्झा आज एकट्या आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. त्या म्हणाल्या, 'माझे आयुष्य, संपत्ती आणि ओळख हिरावून घेणाऱ्या एका व्यक्तीला मी गुन्हेगार मानले होते, पण आता मला कळले आहे की यात आणखी अनेक लोक सामील आहेत.'4 / 6हसीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे हात जोडून आपल्यावर होत असलेल्या अन्यायातून मुक्तता मिळवण्यासाठी मदतीची याचना केली आहे. आपल्यावर बलात्कार करणारा कोर्टासमोरही हजर राहत नसल्याचा आरोप प्यांनी केला आहे. 5 / 6हाजी मस्तान मिर्झा याने अभिनेत्री सोना (मूळ नाव शाहजहान बेगम) हिच्याशी विवाह केला होता, ज्या दिसायला अभिनेत्री मधुबाला यांच्यासारख्या होत्या. हसीन या मस्तान आणि सोना यांच्या कन्या आहेत.6 / 6आपल्या माजी पतीने आठवेळा लग्न केले आहे. माझ्याच बंगल्यावर माझ्याच घरात माझ्यावर अनेकदा बलात्कार केला आहे. असा गुन्हेगार माझ्याच बंगल्यामध्ये आजही राहत आहे. माझ्या सर्व संपत्ती त्याने भाड्याने दिल्या आहेत, त्याचे भाडे तोच वसूल करत आहे. त्याने माझे आयुष्य उध्वस्त केले आहे, असा आरोप हसीन यांनी केला आहे.