'विरुष्का'चं मुंबईत ग्रँड रिसेप्शन, सेलिब्रिटींची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 23:15 IST
1 / 10मुंबई : नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचा दुसरा रिसेप्शन सोहळा मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. 2 / 10मुंबईतील लोअर परेलच्या सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 3 / 10यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यादरम्यान विराट कोहलीने जोधपुरी स्टाईलचा व्हेल्वेट सूट, तर अनुष्का शर्माने सोनेरी वेलबुट्टीचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. 4 / 10या रिसेप्शन सोहळ्याला टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्यासह माजी क्रिकेटर संदीप पाटील, सुनील गावसकर, सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग उपस्थित होते. 5 / 10तसेच जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मनीष पांडे, उमेश यादव, एम एस धोनी यांच्यासह अनेक खेळाडूंनी हजेरी लावली आहे. 6 / 10दुसरीकडे बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, ऐश्वर्या रॉय-बच्चन, माधुरी दीक्षित, ए.आर. रेहमान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.7 / 10विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. 8 / 10त्यानंतर त्यांनी मागच्या आठवडयात दिल्लीमध्ये विवाहाचा पहिला रिसेप्शन सोहळा पार पडला होता. 9 / 10या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. रिसेप्शनच्या एकदिवस आधी विराट कोहली आणि अनुष्काने नरेंद्र मोदींची भेट घेऊन रिसेप्शनचे निमंत्रण दिले होते. 10 / 10दरम्यान, मुंबईतील या रिसेप्शनला सुरुवात होण्याआधी विराट आणि अनुष्का ही देखणी जोडी मीडियाच्या कॅमेऱ्यांना सामोरी गेली.