By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:01 IST
1 / 4जुहू चौपाटीवर जुहू मोरागाव मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खास 21 डिसेंबर 2017 पासून बोटिंग राईड सेवा सुरू केली आहे. 2 / 4गळ्यात जॅकेट घालून 16 सीटर फेरीबोटीचा आणि 8 सीटर मोटर बोटीचा सुमारे 15 ते 20 मिनीटे या राईडचा आनंद पर्यटक लुटतात.3 / 4अथांग समुद्र,आकाशात दर तीन मिनिटांनी जाणारी विमाने आणि पर्यटकांनी फुललेल्या जुहू चौपाटी,सायंकाळी पालिकेने लावलेल्या एलइडी दिव्यांमुळे कुटुंबासह बोटिंग राईडचा थ्रिलिंग मनमुराद आनंद मिळत आहे.4 / 4 - दिल्ली,बिहार,मध्यप्रदेश येथील पर्यटकांनीसुद्धा या थ्रिलिंग बोटिंग राईडचा मनमुराद आनंद घेण्यासाठी हजेरी लावली.