Join us

पत्नीला तिचा पहिला प्रियकर आणि कौमार्याबद्दल कधीही प्रश्न विचारु नका, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 18:51 IST

1 / 7
पत्नीला कधीही तिच्या भूतकाळाबद्दल विचारु नका. पुरुष अनेकदा पत्नीला तिच्या पहिल्या प्रियकराबद्दल विचारतात. सत्य जाणून घेऊन काहीही फायदा होत नाही. फक्त दु:खच पदरात पडते.
2 / 7
पत्नीला तिच्या कौमार्यावरुन कधीही प्रश्न विचारु नका. कदाचित पत्नीचे विवाहाआधी परपुरुषाबरोबर संबंध असू शकतात. तुमच्या आयुष्यातही पत्नीच्या आधी एखादी परस्त्री असू शकते. शरीरसंबंध आले म्हणून चारित्र्यावर संशय घेणे निव्वळ मुर्खपणा आहे.
3 / 7
प्रत्येकाचं स्वत:च असं एक खासगी आयुष्य असतं. पत्नीचही एक असं आयुष्य असू शकतं त्याचा आदर राखला पाहिजे. पत्नी एकांतामध्ये बसली असेल तर तिला कुठलेही उलट-सुलट प्रश्न विचारु नये.
4 / 7
आपल्या आई-वडिलांप्रमाणे पत्नीच्या आई-वडिलांचाही आदर करा. पत्नी उशिरापर्यंत तिच्या कुटुंबियांबरोबर बोलत असेल तर कुठलेही प्रश्न विचारु नका. त्यामुळे कदाचित ती दुखावली जाईल.
5 / 7
पत्नीवर घरात राहण्याची सक्ती करु नका. तिला फिरायला बाहेर घेऊन जा. तिला स्वत:ला घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या.
6 / 7
नोकरदार पत्नी असेल तर ती घर चालवायला तुम्हाला मदतच करेल. पण तिला तेच पैसे कुटुंबिय, मित्रपरिवारावर खर्च करण्याचा पूर्ण अधिकार आहे हे लक्षात घ्या. तिला त्यापासून रोखू नका.
7 / 7
लग्नानंतर पत्नीने जेवण बनवलं पाहिजे अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते. पण यासाठी तुम्ही पत्नीवर दबाव टाकू नका. एखादा दिवस तिला जेवण बनवायच नसेल तर तिच्यामागे बडबड करुन तिला हैराण करु नका.