Join us  

स्वेअर कट अन् डीप मिड विकेटला षटकार, फडणवीसांची क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 2:49 PM

1 / 6
भाजप आमदार कालिदास कोळंबकर (BJP MLA Kalidas Kolambakar) यांच्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थिती लावली. यावेळी फडणवीस यांनी क्रिकेटच्या मैदानात आवर्जुन फलंदाजीचा आनंद लुटला.
2 / 6
फडणवीसांनी एक-दोन चेंडू नव्हे, तर काही षटकं तुफान खेळून काढली. यात त्यांनी काही जोरदार फटके देखील लगावले. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.
3 / 6
फडणवीसांनी यावेळी स्केअर कट, स्ट्रेट ड्राइव्हसारखे फटके खेळले. तर डीप स्वेअर लेगच्या दिशेनं टोलवणारे फटकेही लगावले.
4 / 6
फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजकीय टोलेबाजी देखील केली. 'क्रिकेट खेळताना मला मजा येते, त्यात बॅटिंग करायला आणखी आवडतं. मी बॉडीलाईन बोलिंग करत नाही. मी ऑन द स्टम्प बोलिंग करतो आणि माझा शॉर्टपिचही बॉल नसतो. योग्य टाकत असतो', असं फडणवीस म्हणाले.
5 / 6
जेव्हा समोरचा माझ्या समोर बॅटिंग करतो तेव्हा त्याला सहज खेळता येत नाही. बॉल खेळताना अडचण होते, असं म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या राज्य सरकारला जोरदार टोला लगावला.
6 / 6
फडणवीसांचे फटके पाहून उपस्थित देखील अवाक् झाले. फडणवीसांनीही फलंदाजीत रस दाखवत काही षटकं खेळली.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसKalidas Kolambkarकालिदास कोळंबकरBJPभाजपा