Join us  

Devendra Fadanvis: 'लहान मुलगाही सांगेल शिवसेनेची भविष्यात काय अवस्था होईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 6:43 PM

1 / 8
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या (nawab malik) राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडिओ बॉम्ब टाकला.
2 / 8
फडणवीस हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून नवाब मलिका यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेतही त्यांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली.
3 / 8
भाजपकडून आज मलिकांच्या राजीनाम्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात सरकारविरोधात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा विधानभवनाकडे जात असताना पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेतले.
4 / 8
पोलिसांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांना रस्त्यातच थांबवलं. त्यानंतर, काहींना यलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
5 / 8
पोलीस व्हॅनमधून फडणवीसांना पोलीस ठाण्यात नेत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका केली. शिवसेनेचे हिंदुत्व आता केवळ डायलॉगबाजीपुरते उरले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले
6 / 8
तुम्ही पक्ष बदलू शकतात, पण हिंदुत्व बदलू शकत नाहीत, असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. तसेच, शिवसेनेच्या राजकीय भविष्यासंदर्भातील प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं.
7 / 8
लहान मुलालाही विचारलं तरी तो सांगेल शिवसेनेची भविष्यात काय अवस्था होईल. मला सोडून द्या, कारण मी त्यांचा आता विरोधक आहे. मात्र, त्यांच्या पक्षातील आमदारांना, खासदारांना, जिल्हाप्रमुखांना खासगीत विचारलं तर तेही सांगतील हे विचार घेऊन शिवसेना पुढे जाईल की मागे, असे फडणवीस यांनी म्हटलं.
8 / 8
दरम्यान, आझाद मैदानातून विधानभवनाकडे भाजपचा मोर्चा जात असाताना मेट्रो सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला आणि देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर महिला नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाnawab malikनवाब मलिक