Join us  

Coronavirus: हा मार्ग धोक्याचा, लोकल प्रवास बंदी असल्याने प्रवासी पत्करताहेत धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 8:16 PM

1 / 6
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल महिन्यात सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे पुन्हा एकदा बंद झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास बंदच आहे.
2 / 6
दरम्यान, कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या नागरिकांनाच राज्य शासनाने  रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी  दिली आहे. तरीही अत्यावश्यक सेवेत नसणारे काही प्रवासी नियमभंग करून लोकलमधून प्रवास करत आहेत.
3 / 6
अनेक रेल्वे स्थानकांमधून शेकडो विनातिकीट प्रवास करत असून, टीसी तसेच रेल्वे पोलिसांकडून पकडले जाऊ नये यासाठी अनेक प्रवासी लोकलमधून उतरल्यावर ट्रॅकमधून उड्या टाकून तसेच आडवाटेने स्टेशनबाहेर जात आहेत.
4 / 6
काही प्रवासी रेल्वेतून प्रवास केल्यावर फलाटावर उतरल्यानंतर  शॉर्टकट म्हणून मागूनच रेल्वे ट्रॅक ओलांडून जात आहेत.
5 / 6
तर काही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून पुलाच्या खांबांचा आधार घेऊन  रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूला जात  आहेत.
6 / 6
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र कामावर अनेक नोकरदारांना नियमभंग करून लोकल प्रवासाचा पर्याय निवडावा लागत आहे.
टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेMumbai Localमुंबई लोकलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस