मनसेच्या हवाई कर्मचारी सेनेने शिवाजी पार्कमध्ये राबवले स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:29 IST2017-09-06T15:25:08+5:302017-09-06T15:29:02+5:30

अनंत चतुर्दशीच्या दुस-या दिवशी चौपाटयांवर घाण, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असते. ते दृश्य पाहून प्रचंड त्रास होतो. त्यामुळे नियमित वॉकला जाणारेही दुस-या दिवशी चौपाटीवर जाणे टाळतात.

गणेशविसर्जनानंतर अनेक स्वयंसेवी संस्था स्वत: पुढाकार घेऊन चौपाटयांवर सफाई अभियान हाती घेतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हवाई कर्मचारी सेनेनेही आज बुधवारी दादर शिवाजी पार्क चौपाटी आणि परिसरास सफाई अभियान राबवले.

मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई स्वत: या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

टॅग्स :मुंबईMumbai