मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानवाला केले अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:45 IST
1 / 3भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमसैनिक मुंबईत दाखल झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केले.2 / 3ओखी वादळामुळे मुंबईत पावसाची रिपरिप असली तरीही भीमसैनिक मोठ्या संख्येने दाखल होते. चैत्यभूमीला भीमसागराचे स्वरूप प्राप्त झाले होते.3 / 3इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला महिनाभरात सुरुवात होईल,व याचे टेंडर निघालं आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.